Thursday , December 11 2025
Breaking News

चिगुळे गावच्या सर्वे नं. 1 मधील 16 एकर जमिनीचा वाद संपवा, ग्रामस्थांची मागणी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : चिगुळे (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमिन ही गावची आहे. यावर वैयक्तीक कुणाचा हक्क नाही. यासाठी चिगुळे गावच्या ग्रामस्थांची बैठक सोमवारी दि. 6 रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला चिगुळे परिसरातील कोदाळी, कणकुंबी, कोलिक, गोल्याळी, तळावडे, आमटे, मान, चोर्ला, हुळंद, बेटणे, खानापूर आदी गावच्या पंचमंडळीना बोलविण्यात आले.
बैठकीत चिगुळे गावातील सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमिनित दोन गटाचा वाद होता. तर मार्च महिन्यात क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. त्यावेळेस गावातील एका गटाने मुलांना क्रिकेट खेळण्यास मज्जाव केला. त्यातून वाद उफाळून आला. तेव्हापासून दोन गट होऊन सर्वे नंबर 1 मधील 16 एकर जमीन माजी आहे, असे एका गटाने म्हटल्याने गावकर्‍यांनी ही बाब पोलिस स्टेशनमध्ये, तहलीदार, तसेच प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचविली. व गावाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दि. 6 जुन रोजी चिगुळे गावात 12 गावच्या पंचाना गावकर्‍यांनी बोलावून घेतले व वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु गावच्या विरोधात गेलेल्या गटाने, चिगुळे पंचानी 12 गावच्या पंचाचे म्हणणे एकूण न घेताच जमिनीचा वाद शेवटास नेला नाही. त्यामुळे 12 गावच्या पंचानी यावर तोडगा काढण्यास असमर्थ ठरले व निर्णय झाला नाही.
आता ही समस्या जिल्हा पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या सल्ल्यानुसार तोडगा काढावा, अशी मागणी चिगुळे ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी चिगळे गावचे माजी सैनिक गणपत गावडे यांनी आपले मत मांडले.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *