खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूलची विद्यार्थीनी प्रनिषा परशराम चोपडे हिने दहावीच्या परीक्षेत 621 गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली होती.
मात्र तिने विज्ञान विषय पेपर फेर मुल्यमापणासाठी अर्ज केला त्यात तिला दोन गुण वाढवून मिळाल्याने 623 गुण मिळाले. आता ती मराठी माध्यमातून राज्यात प्रथम आल्याचे सांगण्यात आले. याआधी 622 गुण घेऊन मराठी विभागात कारदगा हायस्कूलची विद्यार्थीनी राज्यात प्रथम आली होती. प्रनिषा चोपडे 623 गुण घेऊन मराठी विभागात राज्यात प्रथम आली.
तिने मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. त्याबद्दल तिचे तालुक्यासह सर्व थरातून अभिनंदन होत आहे. गणेबैल हायस्कूलचे क्रिडाशिक्षक पी. टी. चोपडे यांची ती कन्या होय.
