खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले.
विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या पाण्याची बाॅटल देऊ केली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. एस. वाय. सोनार होत्या. प्रारंभी खानापूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष वाय. एम. पाटील यांनी उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी सदस्य संभाजी चौगुले यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी इयत्ता पहिलीच्या प्रत्येक विद्यार्थीनीना पाहुण्याच्याहस्ते बाॅटलचे वितरण करण्यात आले.
शाळेची प्रगती करून विद्यार्थीनीनी शाळेचे नाव उज्वल करावे, असे मत सदस्य संभाजी चौगुले यांनी व्यक्त केले.
यावेळी शिक्षक एन. एस. कुंभार, सतीश हळदणकर, एस. डी. गुरव, एम. एम. सालगुडे, आकाश कांबळे, क्रिडाशिक्षिका सुवर्णा सिद्दन्नावर, सविता चौगुले, आदी शिक्षक विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतीश हळदणकर यांनी केले. अभार एन. एस. कुंभार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta