Tuesday , March 3 2026
Breaking News

गोधोळी मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट थांबवा : विकास आघाडीची मागणी

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गोधोळी (ता. खानापूर) मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला असल्याचा खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी आरोप केला आहे. यासाठी संबंधित शिक्षण खात्याला गोधोळी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन गोधोळी मराठी शाळेवर अन्याय झाल्यास खपवुन घेणार नाही, असा ईशाराही भरमाणी पाटील यांनी दिला.
निवेदनात म्हटले आहे की, गोधोळी मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून ८० विद्यार्थी शिक्षण घेतात. याच शाळेच्या इमारतीत कन्नड शाळेच्या वर्गखोल्या सुरू करण्याचा डाव गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला आहे.
तालुक्यात जाणीवपूर्वक मराठी शाळेवर अन्याय केला जात आहे. हा अन्याय न थांबविल्या उग्र अदोलन करू, असे भरमाणी पाटील यांनी सांगितले आहे.
मराठी शाळेत विद्यार्थी असताना त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येक विद्यार्थीना मातृभाषा शिकण्याचा तसेच शिक्षणाचा हक्क आहे, असेही भरमाणी पाटील यांनी सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी निवेदनाचा स्विकार केला.
यावेळी निवेदन देताना सुमित कर्लेकर, संतोष कदम, पांडुरंग कुंभार, सागर चव्हाण, नागेंद्र कदम, कृष्णा महाजन, गंगाराम महाजन, मोहन खन्नूकर, ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकात गुरव, अतुल खन्नूकर, सुनिल अष्टेकर, बाळकृष्ण मडवाळकर, प्रसाद कुंभार आदी शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *