खानापूर (प्रतिनिधी) : यंदा खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे अनेक रस्त्याची दयनिय अवस्था झाली. असाच प्रकार खानापूर तालुक्यातील मडवाळ-हलशी रस्त्यावर झालेला आहे.
याबाबतची माहिती अशी की, हलशी- मडवाळ रस्त्यावर बांधण्यात आलेला पूल हा माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रयत्नातून ८६ लाख रूपये खर्चून उभारण्यात आला आहे.
मात्र पांढऱ्या नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुलाजवळील रस्त्याचा भराव तुटत जात आहे.
त्यामुळे रस्त्याचा धोका वाढला असुन भविष्यात रस्ता वाहुन जाण्याचा संभव आहे. त्यामुळे या भागातून जवळपास १० ते १२ गावाचा संपर्क तुटणार आहे.
पांढऱ्या नदीच्या प्रवाहामुळे रस्त्याचा भराव खचून जाऊनये यासाठी दगडी बांधकाम होणे गरजेेच आहे. तरच रस्ता टिकणार आहे. पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे रस्ता वाहुन जाण्याची भिती निर्माण झाली आहे. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
- प्रतिक्रिया
मडवाळ- हलशी रस्त्यावरील पूल लगत पांढऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावरील भराव तुटत आहे. जर असाच भराव तुटत गेला तर रस्ता वाहून जाणार यासाठी दगडी बांधकाम व काँक्रीट करून रस्त्याचा भराव मजबूत करावा अन्यथा एखाद्यावेळी रस्ता वाहून गेला तर १२ गावाचा संपर्क कायमचा तुटणार. – बाबासाहेब देसाई, मडवाळ, भाजप नेते