खानापूर : शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आज खानापूर तालुक्यातील ईदलहोंड मराठी माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
ईदलहोंड (ता. खानापूर) येथील मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनतर्फे दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह मराठी माध्यमात राज्यात प्रथम आलेल्या कु. प्रनिषा चोपडे (99.60 टक्के) हिच्यासह शाळेतील अमूल्य कुलम (97.12 टक्के), प्रांजल पाटील (96.5 टक्के), ऐश्वर्या निडगलकर (93.42 टक्के), दत्तात्रय सुतार (92.32 टक्के), सानिका होसुरकर (92 टक्के), श्वेता पाटील (90.56 टक्के) चंदना सावंत (90.56 टक्के) आदी गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दीपक पाटील, बसवराज कडेमनी, मोहन पाटील आदींसह शाळेतील शिक्षक शाळा सुधारणा समितीचे सदस्य आणि नियती फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta