Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर समितीकडून जांबोटी भागात जनजागृती

Spread the love

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय निघणार्‍या मोर्चा संदर्भात जांबोटी याठिकाणी पत्रके वाटण्यात आली व जांबोटी परिसरातील नागरिकांना या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. निरंजन सरदेसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, खानापूर महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी मोर्चा संदर्भात जागृती करण्याची माहिती दिली.
रविंद्र शिंदे यांनी जास्तीत जास्त नागरिक या भागातून मोर्चामध्ये सहभागी होतील व मोर्चा यशस्वी करतील असे सांगून मोर्चाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी समितीचे पी. एच. पाटील, सूर्याजी पाटील, संभाजी देसाई, दत्तू कुट्रे, राजाराम देसाई, रणजीत पाटील, रवींद्र शिंदे, जमाना गावडे, वासुदेव पाटील, बाबू भरणकर तसेच चोर्ला, कणकुंबी येथील महिला व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *