खानापूर : नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचालित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेची सम्रता लोहार हिने 550 (91.66%) प्रथम क्रमांक संपादित केला आहे. वैभवी केसरकर 546 (91%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक संपादित केला आहे. स्वाती मदावळकर हिने 537 (89.50%) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कला विभागात राजश्री गावडे 431 (71.83%) गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर व्यंकटेश सुंठकार याने 411 (68.50%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर ओंकार मोगरे याने 301(50.33%) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कॉलेजच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta