खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी ग्रूप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शांतिनिकेतन डिग्री काॅलजला राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.
यंदापासुन विज्ञान व वाणिज्य शाखेच्या डिग्रीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सरूवात झाली असुन तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने गुणात्मक शिक्षणासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर व सचिव प्रा. आर. एस. पाटील यांनी केले आहे.
यावेळी बोलताना विठ्ठलराव हलगेकर यांनी सांगितले की, खानापूर शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी पासुन ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी सोय आहे. पुढच्या शिक्षणासाठी राणी चन्नमा विश्वविद्यालयाशी संलग्न विज्ञान व वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाला परवानगी मिळाली आहे.
विद्यार्थ्यांना नर्सरीपासून विज्ञान अथवा वाणिज्य पदवीपर्यंत एकाच ठिकाणी शिक्षणासाठी सोय करण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याठिकाणी पीसीएम व सीबीजेड या दोन्ही भागातून शिक्षण मिळणार आहे.
यावेळी प्रा. आर. एस. पाटील यांनी सांगितले की, रसायनशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लैला साखर कारखाण्यात प्रयोगशीलता व प्रकल्प अभ्यासक्रमाचा लाभ मिळणार आहे. तर वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्याना खीस रोप वाटीकेची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील दुर्मिळ वनस्पती, निर्सगसंपदेच्या अध्ययनाला प्रोत्साहन मिळणार आहे. तर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना महालक्ष्मी पतसंस्थेच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. कमवा आणि शिका या तत्वार पदवी शिक्षण देण्याचा मानस आहे.
याठिकाणी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य सुध्दा करून देण्यात येणार आहे.
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …