
खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचे हस्ते आज यडोगा येथे विठ्ठल रूक्मिणी व हनुमान मंदीराचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खामले होते. आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा व मंदीराचे भूमिपूजन झाले.
त्यानंतर अंजलीताई निंबाळकर, महादेव कोळी, वासुदेव नांदूरकर, अजित पाटील, नागराज येळ्ळूरकर व पाहुणे मंडळी या सर्वांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले. नंतर आमदारांचा सत्कार झाला व सर्व पाहुणे मंडळींचा सुद्धा ग्रामस्थांतर्फे सत्त्कार झाला.
आपल्या भाषणात अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या, की हे मंदीर पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या सोबत माझी सुद्धा आहे. काळजी करू नका आपण हे मंदीर वर्षभरात पूर्ण करू, पावसामुळे आजचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागतोय, मी पुन्हा एकदा तुमच्या गावात येऊन तुमची सर्व कामे मी करून देते, यडोग्याचा रस्ता सुद्धा मी मंजूर केलेला आहे. पावसाळ्यानंतर हा रस्ता होईल, अशी ग्वाही मा. आमदार अंजलीताईंनी दिली…
यावेळी पंचायत सदस्य, मंदीर जिर्णोद्धार कमिटी, पंचकमिटी, गणेश मंडळ, वारकरी मंडळ, हणुमान मंडळ, संतोष पाटील लोकोळी, शिवराम बेळगावकर चापगाव, तसेच यडोगा ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta