Sunday , July 26 2026
Breaking News

छत्रपती संभाजी महाराजांच्या भक्तांना जामीन मंजूर

Spread the love

बेळगाव : जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. 16 जानेवारी 2022 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधवसह इतर दहा कार्यकर्त्यांच्यावर कॅम्प येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कॅम्प पोलीस स्थानकात धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पूजन केल्याबद्दल CRNO 05/ 2022/U/Section 4, 5 (1) 5, (3) 5(4) The karanatka Epidemic Disease Act 2020 हा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यांची जामीनकरिता पाचवे ऍडिशनल सिव्हिल कोर्टात शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आली आहे. कोर्टाचे कामकाज वकील धनकुमार पाटील यांनी पाहिले तर बाळू बेनके यांनी जामीनासाठी प्रयत्न केले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *