खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मुलींच्या शाळेचे शिक्षक एन. जे. सुतार हे 36 वर्षाच्या शिक्षकी सेवेतून नुकताच निवृत्त झाले.
यानिमित्ताने शाळेत निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला शिक्षक संयोजक क्रांती पाटील, एसडीएमसी अध्यक्ष परशराम गुरव, उपाध्यक्षा शितल गुरव, सदस्य जोतिबा गुरव, शिवाजी गोंधळी, संजू कदम, सदस्या मलप्रभा गुरव, संगीता कदम, सुजाता कदम आदी सदस्य तसेच सत्कारमूर्ती निवृत्त शिक्षक एन. जे. सुतार, सीआरपी वीणा सुतार, शिक्षक आर. एन. पत्तार, टी. बी. मोरे, जे. पी. पाटील, श्रीमती बेबी कुंभार, एम. वाय. अष्टेकर, के. एस. पिंगट, रेणुका लोहार तसेच शिक्षण प्रेमी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलींच्या स्वागतगीताने झाली.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत टी. बी. मोरे यांनी केले.
यावेळी उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी निवृत्त शिक्षक सत्कारमुर्ती एन. जे. सुतार याचा सपत्नीक सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पहार, भेटवस्तू देऊन शिक्षकवर्ग, तसेच एसडीएमसीच्या वतीने तसेच विविध शाळाच्या मुख्याध्यापक, शिक्षक, व मित्रपरिवार आदींच्याहस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारला उत्तर देताना एन. जे. सुतार म्हणाले गेली 36 वर्षे शिक्षकी सेवा केली. त्याचबरोबर सीआरपी म्हणून सेवा बजावली तर खानापूर चिरमुरकर गल्लीतील मराठी मुलीच्या शाळेत गेली चार वर्षे सेवा बजावली. याशिक्षकी सेवेत अनेक विद्यार्थी माझ्या हातून शिकून उच्च शिक्षित होऊन उच्चपदावर कार्यरत आहेत. याचा मला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांच्या सहवासात 36 वर्षे कशी निघुन गेली हे कळले नाही. या सेवानिवृत्त निमित्ताने अनेक अधिकारी, मित्रपरिवार, शिक्षक वर्ग आदींनी माझा सत्कार केला याबद्दल ऋणी आहे.
यावेळी शिक्षक, विद्यार्थी आदी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टी. बी. मोरे यानी केले. तर आभार एम. सी. वाली यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta