खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिजंगल भागातील आमटे गावातून बससेवेने या भागातील जवळपास 80 ते 90 विद्यार्थी शाळा, कॉलेज शिक्षणासाठी खानापूरला नियमित ये-जा करतात. मात्र अलीकडे बससेवा बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना खासगी ट्रॅक्स, टॅपो, दुचाकीवरून खानापूरला ये-जा करावे लागते.
सध्या पावसाचे दिवस आहेत. त्या कॉलेजच्या मुलीना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. यासाठी आमटे गावाला बसची सोय व्हावी. म्हणून खानापूर भाजपचे युवा नेते पंडित ओगले याच्या नेतृत्वाखाली खानापूर बसडेपोला भेट देऊन बस आगार प्रमुख महेश कर्हान्नावर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बस आगार प्रमुख महेश कर्हान्नावर यांनी निवेदनाचा स्विकार करून सकाळी सात वाजता कालमणी व्हाया आमटे बससेवा उद्या बुधवारपासून सुरू करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले, लक्ष्मण गुरव, अशोक गावकर, सुरेश केरकर आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta