खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची तातडीने सोडून व्हावी यासाठी प्रयत्न करा अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय खानापूर तालुका युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी एकाच दिवशी ११ हजाराहून अधिक पत्रे पाठविण्याबाबत जनजागृती केली जात आहे. याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फक्त खानापूर तालुका नव्हे. तर बेळगाव, निपाणी व इतर सीमाभागातून देखील पत्रे पाठविली जावीत याला सीमाभागातून व्यापक पाठिंबा प्राप्त व्हावा व लाख भर पत्र पोस्ट व्हावीत यासाठी विविध स्तरातील लोकांची भेट घेऊन पत्र पाठवण्याचे आवाहन केले जात आहे. बुधवारी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, किरण पाटील, राजु कुंभार, मारूती गुरव, राजु पाटील, भूपाल पाटील, दामोदर , ज्ञानेश्वर सनदी, आनंद झुंजवाडकर आदींनी मराठी वकील संघटनेची भेट घेतली आणि हाती घेण्यात आलेल्या मोहिमेची माहिती देऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी ऍड. ईश्वर घाडी, ऍड. अरुण सरदेसाई, ऍड. विनायक सुतार, ऍड. सिद्धार्थ रूपण, उपस्थित होते
Check Also
खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
Spread the love खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून …