खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.

राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना यासंबंधी निवेदन देण्यात आले होते मात्र या निवेदनाच्या केराची टोपली दाखवत म. ए. समितीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले त्याच्या निषेधार्थ आज खानापूर समितीतर्फे रास्तारोको करून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरासह संपर्क रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी म. ए. समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे, असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले.
यावेळी मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, जयराम देसाई, नारायण कापोलकर, बाळासाहेब शेलार, मारुती गुरव, सदानंद पाटील, प्रकाश चव्हाण, विशाल पाटील, सदानंद मासेकर, माऱ्याप्पा पाटील, रणजित पाटील, राजू कुंभार, पुंडलिक पाटील, रमेश देसाई, रमेश ढबाळे, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार आदींसह समिती नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta