Sunday , April 19 2026
Breaking News

राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान

Spread the love

 

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून यामध्ये संसदेतील 99.18 टक्के खासदारांनी मतदानाचा अधिकार बजावला असल्याची माहिती चिफ रिटर्निंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रातील 283 आमदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे तर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल.

राष्ट्रपती पदासाठी संध्याकाळी पाच वाजता मतदान संपलं. या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मतदान केलं. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 480 खासदार आणि आमदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मतदान केलं.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संध्याकाळी चार वाजता आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तृणमूल काँग्रेसने विरोधकांचे उमेदवार यशवंत सिंन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेस आमदार राहुल गांधी यांनी पावणे चार वाजता संसदेमध्ये आपल्या मदतानाचा अधिकार बजावला. तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरूर यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

क्रॉस मतदान ; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीएला मतदान
राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे शहजील इस्लाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार एस. जडेजा, ओदिशामध्ये काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम यांनी मुर्मू यांना मतदान केले.

About Belgaum Varta

Check Also

२५ भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीत उलटली; १० ठार

Spread the love  मथुरा : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *