प्रशासनाचा अनागोंदी प्रकार
खानापूर : खानापूर तालुका सरकारी रुग्णालयातील महिला एमडी डॉक्टर दिडवर्षे झाली बेळगाव जिल्हा रुग्णालयात सेवा बजावत असल्याचे उघड झाले आहे, यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत आहे.
सर्वसामान्यांच्या सोयीसाठी तज्ञांची नियुक्ती केलेली असते पण केवळ स्वतःच्या सोयीसाठी डेप्युटेशन करून घेणे ही संतापजनक बाब आहे तालुक्यातील आरोग्याची समस्या ऐरणीवर असून देखील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना मोकळीक का दिली हा प्रश्नच आहे.
कोरोना काळात तज्ञ डॉक्टरांच्या जागा भरण्यात आल्या होत्या त्यानुआर एक दंतचिकित्सक चार एमबीबीएस डॉक्टर, बीएएमएस, बालरोगतज्ज्ञ, अस्तिरोग तज्ञ, चर्म रोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, भुल तज्ञ सर्जन आशा डॉक्टरांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला होता पण एमडी असलेली महिला डॉक्टर दीड वर्षांपासून म्हणजे कोरोना महामारीपासून हजर झाली नाही तसेच आठवड्यापूर्वी चर्म रोग तज्ञ महिला डॉक्टर यांनी सुध्दा डेप्युटेशनवर बेळगावमध्ये कार्यरत आहेत. खानापूर रुग्णालयातील रिक्त जागा केवळ कागदोपत्री भरल्याचे दिसून येत आहे यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.