खानापूर :खानापूर पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल प्रकाश गाडीवड्डर यांनी नुकताच हरियाणा येथे झालेला राष्ट्रीय स्तरावरील मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. त्याबद्दल नुकताच पोलिस स्थानकाच्या वतीने तसेच हलकर्णी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गाडीवड्डर हे मूळचे गोकाका तालुक्यातील धुपदाळा येथील आहेत. शालेय वयापासूनच त्यांनी कराटे, बॉक्सिंग आणि इतर साहसी क्रीडा प्रकारात विविध स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी कराटेमध्ये शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले असून त्यांनी ब्लॅक बेल्ट आणि सुवर्णपदक मिळविले आहे. पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर . त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय मिश्र मार्शल आर्ट्स सुवर्णपदक व, एकदा आंतरराष्ट्रीय मिश्र मार्शल आर्ट्स सुवर्णपदक जिंकले आहे. डब्ल्यू डब्ल्यु इ स्टार भारतीय महान खली यांच्याकडून त्यांनी फ्री स्टाईल मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे. जिमनॅस्टक मध्येही त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. २०२१ मध्ये खली यांच्या मार्गदर्शनाने वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटसाठी त्यांची निवड झाली होती. मात्र कोविडमुळे कोणतीही स्पर्धा झाली नाही. गोवा येथे आयोजित तिसरी राष्ट्रीय युवा चॅम्पियनशिप बॉक्सिंग मिश्र मार्शल आर्ट्समध्ये 70 किलो वजनी गटात. सुवर्ण पदक मिळविले यासाठी २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या मार्शल आर्ट्स स्पर्धेत गाडीवड्डर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते एक उत्तम सर्पमित्र असून त्यांनी लोकवस्तीत आलेल्या कित्येक दुर्मीळ सापांना त्याच्या अधिवासात सोडले आहे.
२०१६ मध्ये त्याने बंगळुरू शहर पोलीस हवालदार म्हणून सरकारी सेवा सुरू केली असून गेल्या वर्षभरापासून ते खानापूर पोलिस स्थानकात कार्यरत आहे.