खानापूर (प्रतिनिधी) : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील भाजपचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनांनी खानापूरचे भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लक्ष्मी मंदिरापासुन शिवस्मारक चौकापर्यत निषेध फेरी काढली.
यावेळी प्रवीण नेट्टारू यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व गृहमंत्री आरग्य ज्ञानेंद्र यांनी आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी. खून करणाऱ्या मारेकऱ्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. याशिवाय अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी सरकारने कठोरात कठोर शिक्षा देण्याचा निर्णय घ्यावा.
यावेळी हत्येच्या निषेधार्थ मारेकऱ्यांचा निषेध केला.
यावेळी भाजपचे युवा नेते पंडित ओगले, किरण यळ्ळूरकर, जार्डन गोन्सालवीस, अनंत सावंत, आकाश अथणीकर, राजेद्र रायका, मारूती पाटील, प्रकाश निलजकर, तसेच शेकडो हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.