खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नदी नाल्यातील पाणी पातळी वाढली. भात पिकाना जीवदान, शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावर्षी पावसाची हजेरी वेळेत झाली होती. त्यानें शेतातील कामांना चांगला सूर गवसला होता. पण मध्यंतरीच्या काळात अचानक पावसाची दांडी झाल्याने शेतकऱ्यांना चिंतेची बाब झाली होती. ऐन पावसाळ्यात कडक उन्हाची तीव्रता होती. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात असते तापमानाच्या बदलामुळे पिकांवरती रोगराईचे सावट होते. तसेच शेतातील रखडलेल्या कामांना आता चालना मिळाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta