खानापूर (प्रतिनिधी) : ओतोळी (ता. खानापूर) प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत एसडीएमसी कमिटीची निवड नुकतीच पार पडली.
एसडीएमसी निवड कमिटी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य परशराम गावडे होते.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक सौ. वंदना देसाई यांनी केले. त्यानंतर एसडीएमसी कमिटीविषयी पालकांना मार्गदर्शन केले.
एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्ष पदी संजय रामणीचे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी मल्लापा बेळगांवकर यांची निवड करण्यात आली. सदस्य पदी पुंडलिक बामणे, सुभाष नाईक, परशराम नंद्यागोळ, शिवाजी नाईक, महादेव गावडे, मोहन गावडे, मारूती गावडे, सदस्य पदी संगीता गावडे, पुष्पा गावडे, विद्या गुरव, शुभांगी रामणीचे, अस्मिता बामणे, लता नाईक, संगीता बामणे, विद्या नाईक, रेणुका गावडे आदी सदस्यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिक्षक पी. टी. साबळे, सौ. एस. एस. कुलकर्णी, ग्राम पंचायत सदस्य गावडे, सदस्या रेणुका शिंगाळे आदी उपस्थित होते. आभार सौ. वंदना देसाई यांनी मानले.