Monday , December 8 2025
Breaking News

परप्रांतीयांचे लोंढे भूमीपुत्रांच्या मुळावर

Spread the love

 

खानापूर (विनायक कुंभार) : खानापूरात परप्रांतीयांनी जाळे पसरून इथल्या भूमीपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण केले आहे. एवढ्यावरच नथांबत इथल्या गोर गरिबांच्या जमिनी लाटल्या आहेत. निकृष्ट साहित्याची अल्पदरात विक्री करून बाजारातील मान्यताप्राप्त कंपन्यांच्या साहित्य विक्री करणाऱ्याचे नुकसान केले आहे. खानापुरातील भूमीपुत्रांना बेरोजगरिपासून वाचविण्यासाठी परप्रांतीयावर नियंत्रण हवे आशी भावना लोकातून व्यक्त होऊ लागली आहे.
बाजारभावाचे नियम धाब्यावर बसवून तालुक्यातील व्यवसायांना ठेच पोहचवणाऱ्या परप्रांतीयांनी माघारी फिरावे. भूमीपुत्रांच्या हक्कासाठीची ही लढाई असून वेळीच परप्रांतीयावर आवर घालने गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक व्यापाऱ्यांवर मोठे संकट येईल. परप्रांतीयांनी याठिकाणी दुकाने थाटताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. इमारत मालकाच्या परवानगीने काहीजण वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. त्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात नकली माल आणल्याने विश्वासार्हयत ढासळली असून स्थानिक व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे.

शहरातील सरकारी जागांवर अतिक्रमण

राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने शहरातील सरकारी जागांवर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले आहे. मिळेल त्या जागेवर गाडा लावून व्यवसाय करणाऱ्या परप्रांतियांना पोलिसांचा देखील वरदहस्त आहे. ग्रामीण भागांतील नागरिक अशा ठिकाणी शेतीमाल विकण्यासाठी नसल्यास त्यांना हाकलून लावण्यात येते. मात्र परप्रांतियांना अभय दिला जातो. यामुळे भूमिपुत्रांनी जागे होण्याची गरज आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *