खानापूर (विनायक कुंभार) : लोकसंस्कृती नाट्य कला खानापूर संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत कालेकर व ढोलकी पट्टू ज्ञानेश्वर सतार यांनी औरंगाबाद येथील शाहीर अजिंक्य लिंगायत व भारुडरत्न कैं. निरंजन भाकरे यांचे सुपुत्र शेखर भाकरे यांची भेट घेतली. सीमाभागात अनेक लोककला आहेत. कोणत्याही शासनाच्या मदतीशिवाय लोककला जिवंत ठेवण्यासाठी येथील कलाकार सतत प्रयत्नशील असतात. तसेच येथील कलाकारांना शास्त्रोक्त कला शिकता येईल व सीमाभागसह महाराष्ट्रातील व्यासपीठ उपलब्ध व्हावे. यासाठी लवकरच शाहिरी कार्यशाळा व भजनी-भारुड कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे कालेकर यांनी यावेळी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta