खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारकडून भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येत्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला गर्लगुंजी भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कर्नाटक सरकारला जाग आणावी, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी गर्लगुंजी येथे शुक्रवारी झालेल्या जागृती फेरीत केले.
यावेळी ते म्हणाले की, कर्नाटक सरकारकडे कन्नड भाषेबरोबरच मराठी भाषेतून सरकारी परिपत्रके तसेच कागदपत्रके मिळावीत, अशी मागणी केली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. म्हणून येत्या 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला मोठ्या संख्येने राहा असे सांगितले.
यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुरेश मेलगे, गावातील नागरिक भालू पाटील, शंकर पाटील, रमाकांत पाटील, बाबूराव सावंत, गुंडू बिदरभावीकर राहुल पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta