Tuesday , March 3 2026
Breaking News

विभागीय क्रीडा स्पर्धेत अबनाळी शाळेचे उल्लेखनीय यश

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी येथे झालेल्या गुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सांघिक खेळामध्ये मुलांच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक, मुलींच्या थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक तसेच व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तर रिलेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. वैयक्तिक खेळामध्ये गुरुप्रसाद संजय गावकर उंच उडीमध्ये प्रथम, वरूणा देमानी पोटे मुलींच्या उंच उडी मध्ये प्रथम, रविदास परशराम गावकर लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत पुढील तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तसेच बुद्धिबळ क्रीडा प्रकारात मुलांच्या गटातून श्रीधर धानाप्पा करंबळकर, सचिन प्रभाकर डिगेकर, अजय अनिल पास्टोलकर, रविदास परशराम गावकर, गुरुप्रसाद संजय गावकर तर मुलींच्या गटातून सातुली रमेश गावकर, प्रेमीला लक्ष्मण मेंडीलकर, मलप्रभा मारुती गुरव, समीक्षा संतोष गावकर, वर्षा विलास मेंडीलकर हे विजयी झाले असून तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. एस. गुरव, रमेश कवळेकर, विजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर एसडीएमसी अध्यक्ष प्रभाकर डिगेकर आणि गावकऱ्यांचे प्रोत्साहन मिळत आहे. या यशाबद्दल अबनाळी शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. खानापूर तालुक्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती राजेश्वरी कुडची, बीआरसी अधिकारी ए. आर. अंबगी, अक्षरदासोह अधिकारी महेश परीट, शिरोली सीआरपी बी. ए. देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *