खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन खानापूर तालुक्याचे बीईओ राजेश्वरी कुडची यांना नुकतेच देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अतिथी शिक्षकांना प्रत्येक महिण्याला पगार मिळावा, जे अतिथी शिक्षक बसने शाळेला जातात. त्यांना कमी दरामध्ये बसपासची सोय करावी. सरकारी शिक्षकाप्रमाणेच अतिथी शिक्षकांनासुध्दा प्रशिक्षणामध्ये सामावून घेऊन प्रशिक्षण द्यावे.
आदी मागण्या केल्या आहेत.
यावेळी बीईओ राजेश्वरी कुडची यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका अतिथी शिक्षक संघटनेचे मोहन पाटील, गणपती बावकर, बशीर सनदी, इराण्णा काद्रोळी, श्री. जाधव, सुधा असुदे, विना कुडेकर, विश्वनाथ कुलम, योगिता घाडी आदी अतिथी शिक्षक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta