खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरात गुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक शाळेचे कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकीसेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड होते.
प्रारंभी राज्य नोकर संघटना कार्यदर्शी के. एच. कौंदलकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सत्कार मुर्ती ए. एम. पत्तार यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड, माजी सीआरपी गोविंद पाटील, श्री. घाडी, गोपाळ पाटील आदीनी पत्तार सराच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले.
सत्काराला उत्तर देताना ए. एम. पत्तार म्हणाले, की माझा विद्यानगरात घरगुती साधेपणाने सत्कार केला. याचा मला खूप अभिमान व आनंद वाटला. रक्ताच्या नात्यापेक्षा शेजारीपणाचे नाते खूप समाधानाचे वाटले.
यावेळी कार्यक्रमाला हरसनवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जे. ए. मुरगोड, सिंगीनकोप शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एल. डी. नलवडी, बाचोळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता काटगाळकर, उर्दू शाळेच्या शिक्षिका श्रीमती संगनगौडर तसेच शिक्षक रामा अल्लोळकर आदी शिक्षक उपस्थित होते.
Check Also
खानापूर – पारीश्वाड मार्गावर दुचाकी – बसचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार
Spread the love खानापूर : खानापूर – पारीश्वाड मार्गावर दोड्डहोसुर गावानजीक दुचाकी आणि बसचा समोरासमोर …