खानापूर (विनायक कुंभार) : लिंगनमठ भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यापरिसरात वन्यप्राणी नसतानाही प्राणी येत असल्याने शेतकऱ्यात चिंता पसरली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. कुंचवाड, गोधोली, मस्केनट्टी, सोन्यानहट्टी या गावातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. भागात ऊस, मका, भात, कापूस, भाजीपाला उत्पादनाचे मोठे क्षेत्र आहे. गेल्या वर्षभरात या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. कोल्हे, मोर, रानडुक्कर, गवे, वानर आदींची संख्या वाढली असून पिकांचा फडशा पाडला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. या प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच पिकाची पाहणी करून योग्य ती भरपाई द्यावी आशा मागणीचे निवेदन कुंचवाडमधील शेतकरी रमेश पाटील यांनी वनखत्याला नुकताच सादर केले आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …