खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत सेवानिवृत्त कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरल होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम देसाई, सीआरपी बी. ए. देसाई, ग्राम पंचायत सदस्या सौ. स्वाती गुरव, बी. बी. चापगावकर, तसेच एसडीएमसी कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मुलीच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. ए. मधाळे यांनी प्रास्ताविक केले. तर उपस्थितांचे स्वागत अतिथी शिक्षिका सौ. दिपाली करंबळकर यांनी केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार याचा सपत्नीक शाल, श्रीफळ, भेटवस्तू तसेच पत्नीचा साडी चोळी व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी, पाहु़ण्याची तसेच शिक्षकांची पत्तार सरांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.
शेवटी सत्काराला उत्तर देताना श्री. पत्तार म्हणाले, की गेली ४० वर्षे गुंजी केंद्रात शिक्षकी सेवा केली. नोकरीची सुरूवात याच केंद्रातुन झाली आणि सेवानिवृत्ती याच केंद्र शाळेतुन झाली.
४० वर्षाच्या काळात माझ्या हातुन अनेक विद्यार्थी शिकून उच्च पदावर कार्यरत आहेत. याचे मला समाधान आहे. या शाळेतुन शिक्षकाचे मोलाचे सहकार्य लाभले. याचा मला आनंद आहे,
अशी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला गुंजी केंद्रातील विविध शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य, गावचे शिक्षण प्रेमी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. आर. एस. मजुकर यांनी केले. तर आभार अतिथी शिक्षिका सौ. कुंभार यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta