Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव-चोर्ला महामार्गावर झाडे कोसळली; वाहतूक बंद

Spread the love

 

खानापूर : बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमनी गावाजवळ मोठी झाडे कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद पडली आहे.
बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमणी गावाजवळ एकाचवेळी दोन मोठी झाडे कोसळली. त्यामुळे बेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. संबंधित खात्याकडून झाडे हटविण्याचे काम सुरु असून, दोन्ही झाडे हटविल्यानंतरच हा मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *