Thursday , June 4 2026
Breaking News

भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी दीपक हळदणकर यांची निवड

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी एकत्र येऊन भारतीय प्रजादल या नावाची सामाजिक संघटना स्थापन केली आहे. या भारतीय प्रजादलाच्या अध्यक्षपदी श्री. दीपक दत्तात्रय हळदणकर यांची नेमणूक करण्यात आली.
या भारतीय प्रजादलाच्या माध्यमातून गरीब निराधार जनतेची सेवा करणे तसेच जनावरांची सेवा करणे, युवकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व्यसनमुक्ती शिबीर भरविणे, त्याचबरोबर प्रमुख मंदिरांची स्वच्छता मोहीम राबविणे व इतर समाजोपयोगी कामे करणे हे उद्दिष्ट घेऊन भारतीय प्रजादल शहर आणि ग्रामीण भागात कार्य करण्याचा मानस अध्यक्ष दीपक हळदणकर यांचा आहे. यासाठी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या वर्गाने सहकार्य करणार असल्याची माहिती दिली. या भारतीय प्रजादलाच्या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *