खानापूर : रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एक प्रवासी जखमी झाले आहेत.
बेंगळुरूहून गोव्याला जाणारी नागश्री ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर कोसळली. रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ आज सकाळी 8.00 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात बस चालक आणि वाहकासह एक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील लोंढा दूरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उपचारांसाठी जखमींना इस्पितळात दाखल केले.
Belgaum Varta Belgaum Varta