खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील गुरूदेव फाऊंडेशनच्यावतीने तसेच भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सौजन्याने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी आयोजित मोफत आरोग्य तपासणीला जवळपास शंभरहून अधिक रूग्णांनी उपस्थिती दर्शविली होती.
उपस्थित भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. कविता अर्जुनराव यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन होऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी रूग्णांना मोफत औषधे व उपचार करून रोगाचे निदान केले. या डॉ. कविता अर्जुनराव यांनी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह रूग्णांची तपासणी केली.
जांबोटी भागातील नागरिकांनी याचा लाभ घेतला.
शिबीर पार पाडण्यासाठी डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह बसवराज हपली, श्री. सडेकर, भाजपचे कार्यकर्ते अर्जून गावडे, श्री. डांगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी बसवराज हपली यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta