Monday , April 20 2026
Breaking News

सुनावणी वेळेवरच होणार, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची मागणी फेटाळली

Spread the love

 

नवी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पण, निवडणूक आयोगाने 19 तारखेपर्यंत मुदत दिल्यामुळे शिवसेनेने सुनावणी घेण्याची विनंती केली. पण सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी फेटाळली असून वेळेवरच सुनावणी होणार आहे.
शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरीत आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी पाच याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलत 22 ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.
परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे याचिका लिस्ट करण्याची शिवसेनेने मागणी केली. पण अजून कुठलाही निर्णय आम्ही दिला नाही, असं म्हणत कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला. शिवसेनेवरील दाव्याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाने केली. पण सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सुनावणी आपल्या वेळेवर होईल.
शिवसेनेच्या दाव्याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. पुढील आठवड्यात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्याआधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची मागणी उद्धव ठाकरे यांच्या गोटातून होत आहे. मात्र आज सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ठरलेल्या वेळेतच सुनावणी होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *