खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीघाटावरील श्री जगन्नाथ मंदिराच्या आवारात उद्या गुरूवारी दि. 19 रोजी सायंकाळी 6 ते 9 पर्यंत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामुर्ती संघ संस्थापक आचार्य कृष्णकृपा मुर्ता ए.सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभूपाद प्रचार केंद्र यांच्यावतीने श्री कृष्ण जन्माष्टमी महेत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी गुरूवारी सायंकाळी 6.30 ते 7 वाजेपर्यंत कीर्तन, रात्री 7 ते 8 अभिषेक, रात्री 8 ते 8.45 वाजेपर्यंत वरीष्ठ भक्ताकडून प्रवचन व रात्री 8.45 ते 9 वाजेपर्यंत आरती, रात्री 9 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचबरोबर साप्ताहिक कार्यक्रम दर शनिवारी सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत प्रवचन, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
तरी खानापूर शहरासह तालुक्यातील भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta