Sunday , July 26 2026
Breaking News

सेवा फौंडेशनकडून अपघात जागृती फलक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टने शाळांजवळ वाहतूक जनजागृतीचे फलक लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
बेळगावात दोन विद्यार्थ्यांचा अवजड वाहनांच्या धडकेने मृत्यू झाल्यानंतर पोलीस आणि सामाजिक संघटना खडबडून जागे झाल्या आहेत. बुधवारी सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टच्या अधिकार्‍यांनी शहरातील कॅम्प, खानापूर रोड, कॉलेज रोड यासह इतर भागात शाळा-महाविद्यालये असलेल्या रस्त्यांवर वाहतूक जनजागृतीचे फलक लावले.
यावेळी बोलताना वाहतूक विभागाचे एसीपी शरणप्पा म्हणाले की, मुलांना शाळांजवळ कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्ट अपघात टाळण्यासाठी जनजागृती करत आहे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सेवा फौंडेशन वेल्फेअर ट्रस्टचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *