खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले आहे. याचे उदाहरण म्हणेज गरबेवट्टी- खैरवाड गावाना जोडणारा 1500 फुट रस्ता असुन या रस्त्याची दयनीय अवस्था झालाी आहे. संगोळी रायन्ना वसतिगृह शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकाना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे.
यावेळी रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी भरमानी प्रकाश पाटील, खैरवाड ग्रामपंचायत सदस्य सुधीर गुरव, हनमंत पाटील, लक्ष्मण वारगावडे, हनमंत निलजकर, आजोबा सागरेकर, मारूती गुरव, राजाराम मादार, मलेशी दळवी, गजानन पाटील, मनोहर गुरव, पवन पाटील, विशाल पाटील व गावकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta