Wednesday , April 22 2026
Breaking News

प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू

Spread the love

 

वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमी उत्सवावेळी दुर्घटना घडली आहे. जन्माष्टमी उत्सवावेळी बांके बिहारी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भक्तगण जखमी झाले आहेत. बांके बिहारी मंदिरात मंगला आरती दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगला आरतीच्या वेळी चेंगराचेंगरी

वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यंदाही श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला गेला. बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीमुळे लाखोंची गर्दी होती. बांके बिहारी मंदिरात पहाटे चार वाजता मंगला आरती केली जाते. जन्माष्टमीवेळी मंगला आरती सुरु असताना चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झालाय. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.

वृंदावनमधील सर्व मंदिरांमध्ये मोठी गर्दी

वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरात देश-विदेशातील भाविकांची गर्दी नेहमीच असते, मात्र जन्माष्टमीवेळी ही गर्दी वाढते. जन्माष्टमीच्या दिवशी मथुरेमधील 84 किलोमीटरमध्ये असलेल्या सर्व मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. यंदा जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सुमारे 50 लाख भाविक मथुरेत पोहोचले होते, ही संख्या परिसराच्या क्षमतेपेक्षा मोठी आहे. सध्या या अपघाताबाबत प्रशासनाकडून कोणतही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *