Monday , September 21 2026
Breaking News

टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक; 2 ठार

Spread the love

 

बेळगाव : अथणीपासून मिरज रोडवर टेंम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले. तर सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत होते.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अथणीपासून मिरज रोडवर 3 किलोमीटरवर बनजवाड हायस्कूल व कॉलेज आहे. आज (शनिवार) सकाळी साडेसातच्या सुमारास अथणी येथील कॉलेज विद्यार्थ्यांना घेऊन बस निघाली होती. यावेळी मिरजहून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरलेला आयशर टेम्पो येत होता. अथणीपासून 300 मीटरवर मुख्य रस्त्यावर टेम्पो व बसची जोराची धडक झाली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बसमधून जाणाऱ्या एका शिक्षकाचा हात व पाय तुटला असून चालकाच्या बाजूला बसलेले काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. आ. श्रीमंत पाटील फाउंडेशनच्या वतीने काही रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठवून सर्व जखमी विद्यार्थ्यांना वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले.
हे सर्व विद्यार्थी अथणीचे स्थानिक नसून कॉलेजसाठी परगावहून आलेले आहेत. त्यांना कॉलेजने सुरू केलेल्या अथणी येथील हॉस्टेलमध्ये ठेवलेले आहे. या हॉस्टेलमधून त्यांना कॉलेजला घेऊन जाणारी ही बस होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *