Wednesday , March 4 2026
Breaking News

माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुका भाजपकडून येडियुराप्पा यांचे अभिनंदन

Spread the love

 

खानापूर (विनायक कुंभार) : भाजप केंद्रीय संसदीय मंडळ व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका भाजपकडून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे अभिनंदन करण्यात आले.
खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश देसाई आदींनी त्यांची बेंगलोर येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्यानंतर खानापूर तालुक्यातील विविध समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सुरू असलेल्या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी सूचना संबंधित खात्याना करावी, अशी मागणी केली.
यावेळी भाजप युवा कार्यकर्ते नगरसेवक गुंडू टोपिनकट्टी, गजानन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *