अध्यक्ष विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली माहिती
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील महालक्ष्मी ग्रूप संचालित लैला साखर कारखाण्याचा दुसरा हप्ता १७५ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती लैला शुगर्स कारखान्याचे अध्यक्ष, श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, यावर्षी गाळपाची तयारी पूर्ण झाली असून दसऱ्यानंतर लैला साखर कारखान्याचा गाळप हंगामाची सुरूवात करण्यात येणार आहे.
यंदाच्या गाळप हंगामात पाच लाख टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, यावर्षीच्या गळीत हंगामात ऊस तोडणी सुलभ व्हावी यासाठी महाराष्ट्रातून ४०० ऊसतोड टोळ्या मागविण्यात आल्या असून योग्य वेळेत लैला साखर कारखाना सुरू करून शेतकऱ्यांनी पाठविलेल्या ऊसाची बिले ताबडतोब देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तेव्हा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस बाहेर न पाठविता लैला साखर कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, अशी माहिती दिली.
यावेळी लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील, संचालक महादेव बांदिवडेकर, अधिकारी बाळासाहेब शेलार आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta