खानापूर (प्रतिनिधी) : झाड अंकले (ता. खानापूर) येथील सरकारी लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसी कमिटीच्या अध्यक्षपदी उमेश म्हात्रे धबाले तर उपाध्यक्षपदी सातेरी ओमाणी गुंजीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर एसडीएमसी कमिटीच्या सदस्यपदी 18 जणांची निवड करण्यात आली.
सदस्य पदी यल्लापा देवलतकर, नागेश धबाले, मोहन देवलतकर, सोमनाथ मोटर, सुरेश निलजकर, दिपक निलजकर, यल्लापा मेलगे, सदस्यापदी वैशाली धबाले, सुषमा गुंजीकर, रेणूका देवलतकर, सौंदर्या धबाले, ममता देवलतकर, रेणूका मोटर आदीची निवड करण्यात आली आहे.
यावेळी एसडीएमसी कमिटीची निवड होताच नुतन अध्यक्ष उमेश धबाले व इदलहोंड ग्राम पंचायत पीडीओ बळीराम देसाई यांचा शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. यादवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
नुतन अध्यक्ष उमेश धबाले, पीडीओ बळीराम देसाई यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी म्हत्रू धबाले, चांगला निलजकर, म्हणून धबाले, ग्राम पंचायत सदस्य भोमाणी यळ्ळूरकर, वैशाली धबाले, तसेच गावातील जेष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, उपस्थित होते.
शेवटी मोहन पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta