Saturday , October 19 2024
Breaking News

नंदगड विभागीय स्पर्धेमध्ये मलप्रभा हायस्कुल चापगावचे यश

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या मलप्रभा हायस्कूल च्या खेळाडूंनी नांदेड विभागीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

सांघीक खेळामध्ये

खो-खो मुले – प्रथम क्रमांक
खो – खो मुली – प्रथम क्रमांक
कब्बड्डी मुले – प्रथम क्रमांक
४×१०० रिले मुले – प्रथम क्रमांक
कब्बड्डी मुली – द्वितीय क्रमांक
४× १०० रिले मुली – द्वितीय क्रमांक
हॉलिबॉल मुले – द्वितीय क्रमांक संपादन केले. तर वैयक्तिक स्पर्धेत विजयी विद्यार्थी

कु. श्रीनाथ ना. कुराडे – उंच उडी, गोळाफेक प्रथम क्रमांक व १५०० मिटर धावणे द्वितीय क्रमांक

कु. आर्यन शं. देवलतकर ५००० मिटर फास्ट चालणे प्रथम क्रमांक

कु. अजय तोरगल – २०० मिटर तिसरा क्रमांक

कु. सानिका हंगिरकर ४०० मिटर प्रथम क्रमांक

कु. आरती तोरगल – उंच उडी द्वितीय क्रमांक, लांब उडी तृतीय क्रमांक

कु. लक्ष्मी हंगिरकर – ८००मिटर धावणे द्वितीय क्रमांक

कु. गौरी पाटील -१५०० मिटर तृतीय क्रमांक

विद्यार्थ्यांना हायस्कुलचे मुख्याध्यापक व्हि. बि. होसूर, शारिरीक शिक्षक पि. के. चव्हाण, सहशिक्षक पि. बि. पाटील, एन. एन. दळवाई, व्हि. बि. बेळगावकर, एस. एस. नंद्याळकर, टी. पि. सनदी, एन. एन. कुराडे, एम. एम. बस्तवाडकर, अप्पाजी पाटील तसेच शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक मलप्रभा हायस्कुल चापगाव यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा

Spread the love  बेळगाव : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *