
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात श्रावणी सोमवारी निमित्ताने परव उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ग्राम दैवत माऊली मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माऊली देवीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी गावातील देव घरातुन वाद्याच्या गजरात पालखी मंदिराकडे प्रयाण करण्यात आली.
यावेळी परव निमित्त माऊली मंदिरात प्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रसादाला गावातील अबालपासून वृध्दापर्यत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सायंकाळी पुजारी, पंच गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य गावचे नागरिक यांच्या सहकार्याने परव उत्साहात पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta