खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटीतील (ता. खानापूर) गावच्या राजवाडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटच्या कामाचा प्रारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर राजवाडा रस्त्याच्या सीसी रोडसाठी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्या फंडातून या निधी मिळाला असुन कामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती माजी तालुका पंचायत सदस्या भाजप नेत्या धनश्री सरदेसाई यांनी दिली.
कामाच्या शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, विठ्ठल देसाई, जयवंत देसाई, हणमंत काजुनेकर, कृष्णा कळेकर, रविंद्र शिंदे, पांडुरंग गुरव, विलास देसाई कंत्राटदार तम्माणा बेकवाड, शिवा गुरव तसेच जांबोटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta