खानापूर : नेरसाजवळील गावळीवाडा अंगणवाडीच्या बाहेर झाडाला प्लास्टिक पिशवीत लटकवून नवजात अर्भकाला ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. आत्ता ते अर्भक अल्पवयीन जोडीदारांच्या प्रेम संबंधातून झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या घटनेबद्दल गेल्या दोन तीन दिवसांपासून वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते, त्या अर्भकाला अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे समोर येताच या घटनेला वेगळं स्वरूप प्राप्त झाले आहे.
गवळीवाड्यातीलच एका अल्पवयीन युवकाने व युवतीने प्रेमसंबंध ठेवले होते, त्यातूनच हे अर्भक जन्माला आले. मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने घरातील दोन्ही कुटुंबांनी जबाबदारी नाकारल्याने ते अर्भक उघड्यावर ठेवण्यात आले. आत्ता यावर प्रशासन कोणती कार्यवाही हाती घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सविस्तर वृत्त काहीच वेळात वाचायला मिळेल.