खानापूर : सोमवारी दि. 29 रोजी विजेच्या धक्क्याने मृत पावलेले माचीगड ग्रामपंचायत वाटरमन रामचंद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी सांत्वन केले.
यावेळी वडील राजाराम शिंदे, पत्नी रूपाली शिंदे त्यांची लहान मुले यांच्यासोबत आमदार निंबाळकरानी चर्चा केली.
तसेच लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्यासंदर्भात हेस्कॉम सोबत बोलणे केले असून महिनाभरात सरकारी मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याबरोबर मुलांच्या शाळेसंदर्भात कोणतीही अडचण येऊ देणार नाही व कुटुंबियांच्या सदैव पाठिशी राहणार आहे, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिली
यावेळी गावातील नारायण मोरे, पप्पू पाटील, महादेव मोरे, तमन्ना कोलकार, अनिल सुतार नंदगड, महांतेश कल्याणी वगैरे उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta