खानापूर : विश्वभारती कला क्रीडा संघटना बेळगाव यांच्यावतीने नेहरू स्टेडियम बेळगाव ग्राउंडवर रविवार दि. 11 सप्टेंबर 2022 सकाळी 9 वाजता व्हीलचेअर विकलांग बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेत खानापूर तालुका व बेळगाव ग्रामीण भाग व्हीलचेअर खेळाडू भाग घेत आहेत.
व्हीलचेअर विकलांग स्पोर्ट व मनोबल उंचावण्यासाठी नेहमीच विश्वभारती क्रीडा संघ कार्यरत असते. दुर्गमभागात लहान मुलांना शिक्षणाबरोबर अभ्यासाची आवड, खेळाची, योगाची, व्यायामाची, स्पर्धांची आवड निर्माण व्हावी यासाठी जनजागृती नियमित करत असते व आपला भारत देश बळकट करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, असे विश्वभारती क्रीडा संघटनेचे प्रमुख माजी सैनिक अनिल साताप्पा देसाई हलशीवाडी यांनी सांगितले आहे.