


खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या मागासलेल्या भागातील ओलमणी येथे एक गाव एक गणपतीची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.
या एक गाव एक गणपतीच्या परंपरेने गावात एकोपा, भक्ति मार्गी लागली आहे.
गावचा हा गणेशोत्सव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या गुण्यागोविंदाने उत्साहात साजरा करतात. दरम्यान उद्या गुरुवार दि. ८ रोजी सकाळी 11 वाजता महापूजा करण्यात येणार आहे. पांडुरंग गल्ली यांच्या वतीने दुपारी 1 ते 4 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta