Monday , April 20 2026
Breaking News

हंचिनाळ येथे शनिवारी हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य कीर्तन सोहळा

Spread the love
कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो लोकांना महापर्वणी; विक्रमी संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता
हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ (ता.निपाणी) येथे शनिवारी 10 सप्टेंबर रोजी खास लोक आग्रहास्तव समाज प्रबोधन भव्य कीर्तन सोहळा व व्याख्यान परमपूज्य ईश्वर महास्वामीजी भक्ती यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम हंचिनाळ येथील फुटबॉल व क्रिकेट मैदान संभाजी कोपर्डे शेती फार्म शेजारी माळ भाग हंचिनाळ येथे असून. प्रारंभी 7 वाजता पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील आदर्श सरपंच पुरस्कार विजेते श्री. भास्करराव पेरे पाटील यांचे प्रथम व्याख्यान होणार असून त्यानंतर हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समाज प्रबोधनात्मक भव्य कीर्तनाला प्रारंभ होणार असून किर्तन पूर्ण होई तोपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश काशीद (कारदगा) व श्रीकांत चौगुले (हंचिनाळ) हे करणार आहेत.
आयोजकाने दिलेल्या माहितीनुसार निवृत्ती महाराज यांचे बेळगाव जिल्ह्यात प्रथमच किर्तन होणार असल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रसह लाखो भक्तांना भाविकांना लोकांना समाज प्रबोधनात्मक किर्तन व व्याख्यान ऐकण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ दोन्ही राज्यातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी हंचिनाळ सारख्या लहान गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून ग्रामीण जनतेला समाज प्रबोधनात्मक किर्तन व व्याख्यानाची मोठी संधी निर्माण करून दिल्यामुळे आयोजकांचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचा दिवस जवळ आल्याने सर्व व्यवस्था पूर्ण केल्या असून लोकांना उत्तम सेवा दिली जाणार असून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार आयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *